Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान

गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (ता. २४) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा वादळी पावसाला पोषक हवामान (Weather) होत आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळर ठिकाणी हलक्या सरींनी शिडकावा केला. गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

तर शुक्रवारपासून (ता. २४) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा जाणवत आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यतील उच्चांकी ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी १३ अंशांच्या पुढे कायम आहे.

तमिळनाडूपासून, कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

तसेच वाऱ्यांचे प्रवाहदेखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारी (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात विजांसह वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.


बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :


पुणे २९.८ (१४.९), नगर ३०.० (१५.८), जळगाव ३१.७ (१६.५), धुळे ३१.५ (१३.२), कोल्हापूर ३२.८ (१९.२), महाबळेश्वर २१.८ (११.२), नाशिक २९.४ (१६.२), निफाड ३०.६(१३.५), सांगली ३२.६ (१८.७), सातारा २९.३ (१५.८), सोलापूर ३४.८(२०.४), सांताक्रूझ ३१.६ (२२.४), डहाणू ३१.६ (२१.९), रत्नागिरी ३१.८ (२१.४), छत्रपती संभाजीनगर ३०.८ (१९.०), नांदेड - (२०.६), परभणी ३३.३ (२०.६), अकोला ३२.९ (१९.७), अमरावती ३२.६(१९.४), बुलढाणा ३०.८ (२०.२), ब्रह्मपूरी ३४.१ (२०.६), चंद्रपूर ३५.८ (२१.०), गडचिरोली ३१.२(१७.८), गोंदिया ३१.० (२०.४), नागपूर ३३.२ (२१.६), वर्धा ३४.१(२१.४), वाशीम ३३.२ (१८.८), यवतमाळ ३४.५ (२१.२).

विजांसह पावसाची शक्यता :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT