Maharashtra Winter  Agrowon
हवामान

Maharashtra Winter : पाकिस्तानकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्र गारठला

Weather Update : पश्‍चिमी चक्रावात, हवेच्या वरच्या थरात वाहणारे वेगवान पश्‍चिमी वाऱ्यांचे झोत, तसेच पाकिस्तानकडून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे.

Team Agrowon

Pune News : बंगालच्या उपसागरातील ‘फेइंगल’ चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील थंडी घालवली. त्यानंतर पश्‍चिमी चक्रावात, हवेच्या वरच्या थरात वाहणारे वेगवान पश्‍चिमी वाऱ्यांचे झोत, तसेच पाकिस्तानकडून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. पुढील आठवडाभर थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे.

राज्यात किमान तापमानात घट होत असून, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील किमान तापमान घटल्याने थंडी वाढू लागली आहे. दिवसभर वारे वाहत असून, सायंकाळनंतर हे वारे अधिकच बोचरे होत असल्याचा अनुभव राज्याच्या विविध भागांत पाहायला मिळत आहे. पहाटेच्या वेळी गारठा अधिक वाढण्याबरोबरच धुके आणि दव पडल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, की समुद्र सपाटीपासून १२.५ किलोमीटर उंचीपासून ते ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत वरून खाली (व्हर्टिकली डाउन) टप्प्याटप्प्याने सरकलेले वेगवान पश्‍चिमी अतिथंड कोरड्या वाऱ्याच्या झोताचा (जेट स्ट्रीम) पट्टा उत्तर भारताकडून दक्षिणेकडे (हॉरिझाँटली लॅटरल) ३७ अंश उत्तर १९ अंश उत्तर अक्षवृत्तादरम्यान रुंदावला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकणात किमान तापमानाचा पारा खालवला आहे.

यातच जमीन पातळीवरही, समुद्र सपाटीपासून साधारणतः १.५ किलोमीटर उंचीपर्यंत, पाकिस्तानकडून वायव्य दिशेने येऊन महाराष्ट्रात पश्‍चिमी दिशा घेणारे थंड कोरडे वाहत आहे. या दोन्ही वाऱ्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्रात खानदेश, नाशिककडून हळूहळू थंडी पडण्यास अपेक्षितपणे सुरुवात झाली आहे. पुढील १० दिवस म्हणजे बुधवारपर्यंत (ता. १८) थंडी टिकून राहण्याची शक्यता जाणवते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT