Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : राज्यात हुडहुडी कायम राहणार

Winer Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्राकडे धाव घेतल्याने राज्यात गारठा चांगलाच वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्राकडे धाव घेतल्याने राज्यात गारठा चांगलाच वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे.

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १७) राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून, मंगळवारी (ता. १६) हरियानाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतात धुक्याचे साम्राज्य कायम आहे. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्लीसह उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, निफाडपाठोपाठ धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर, नाशिक येथे तापमान १० अंशांपेक्षा खाली आले आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा ९ ते १६ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानातील घट कायम राहून गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.१ (१०.८), नगर २८.८ (९.६), धुळे २८.५ (८), जळगाव ३०.४ (९.४), कोल्हापूर ३१.७ (१६.९), महाबळेश्‍वर २६.८ (१४.७), नाशिक २९.३ (९.८), निफाड २८.८ (७.४), सांगली ३२.१ (१५.८), सातारा ३१.३ (१२.४), सोलापूर ३३.७ (१४.५), सांताक्रूझ ३१.३ (१६.२), डहाणू २८.३ (१५.५), रत्नागिरी ३२.६ (१६.३),

छत्रपती संभाजीनगर २९.२ (९.२), नांदेड ३०.२ (१४), परभणी ३०.६ (१३.५), अकोला ३०.६ (१२.३), अमरावती २९.४ (१३.५), बुलडाणा २८.५ (१२.६), ब्रह्मपुरी ३२.६ (१५.८), चंद्रपूर ३०.६ (१४.४), गडचिरोली ३१.४ (१४.२), गोंदिया २९.८ (१२.४), नागपूर ३० (१४.२), वर्धा ३१ (१४), वाशीम ३२.४ (१४.०), यवतमाळ ३२ (११.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT