Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : गारठा कायम राहण्याची शक्यता

Winter Update : राज्यात नीचांकी किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर किमान तापमानात चढ-उतार होत आहेत.

अमोल कुटे

Pune News : राज्यात नीचांकी किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी राज्यात गारठा कायम आहे. आज (ता. ३०) राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार, गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला आहे. सोमवारी (ता. २९) बिहारमधील सबोर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानात किमान तापमान ७ ते १० अंशांदरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही स्थिती काहीशी निवळली आहे.

राज्याच्या तापमानात वाढ झाली असली तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा टिकून असल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता. २९) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८.६ अंश तापमानाची नोंद झाली.

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.१ अंश तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते २१ अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ३०) किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.१ (१३.७), धुळे ३३.० (८.६), जळगाव ३१.८ (११.३), कोल्हापूर ३०.६ (१७.९), महाबळेश्वर २६.३ (१५.२), मालेगाव ३०.२ (१४.२), नाशिक ३१.४ (१२.५), निफाड ३०.१ (९.१), सांगली ३०.६ (१६.८), सातारा ३०.७ (१५.७), सोलापूर ३३.०(१७.१), सांताक्रूझ ३४.२ (१८.४), डहाणू २८.७ (१७.४), रत्नागिरी ३४.५ (२०.२),

छत्रपती संभाजीनगर ३०.२ (१५.९), नांदेड ३०.८ (१६.६), परभणी ३०.९ (१४.४), अकोला ३२.० (१५.१), अमरावती ३०.६ (१३.७), बुलडाणा ३०.५ (१५.०), ब्रह्मपुरी ३३.८ (१३.०), चंद्रपूर ३०.० (१२.०), गडचिरोली २८.६ (१३.०), गोंदिया २९.२ (११.६), नागपूर २९.६(१२.८), वर्धा ३०.०(१३.६), वाशीम ३०.० (१३.६), यवतमाळ २७.० (१५.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US India Trade Deal: अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांवर परिणामाची भीती

Election Campaign: पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या निधनाचे प्रचारावर सावट

Farmer Success Story: भांगे- पाटील यांच्या हुरड्याची दिल्लीपर्यंत ओळख

Baramati Agro Sugar Factory: ऊस गाळपात बारामती अॅग्रो साखर कारखाना आघाडीवर

PDKV Convocation Ceremony: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षान्त सोहळा

SCROLL FOR NEXT