Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

Maharashtra Today Weather Update : परभणी, निफाड, धुळे आणि अहिल्यानगर येथे हुडहुडी वाढली आहे. आज (ता.२७) किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्याचा पारा घसरला आहे. किमान तापमान हंगामात प्रथमच ८ अंशांवर पोहोचले आहे. परभणी, निफाड, धुळे आणि अहिल्यानगर येथे हुडहुडी वाढली आहे. आज (ता.२७) किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका तीव्र होऊ लागला आहे. मंगळवारी (ता. २६) पंजाबमधील ‘अदामपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील ८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालय निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि अहिल्यानगर येथे १० अंश तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या खाली आला आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३३.४ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २७) किमान तापमानात आणखी घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदविले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २८.४ (१०.८), अहिल्यानगर - (९.७), धुळे - (९), जळगाव ३०.२ (१०.५), कोल्हापूर २८.७ (१५.७), महाबळेश्वर २४.६ (१२.६), मालेगाव २६.८ (१३.०), नाशिक २७.५ (१०.८), निफाड २७.५ (८.८), सांगली २९.८ (१५.३), सातारा २८.९ (१२.९), सोलापूर ३१.८ (१५.५), सांताक्रूझ ३३.१ (१६.८), डहाणू ३२.२ (१७.५),

रत्नागिरी ३३.४ (१९.६), छत्रपती संभाजीनगर २८.६ (१२.१), धाराशिव - (१६), परभणी २८.५(१२), परभणी कृषी विद्यापीठ २८.३ (८), अकोला ३०.६ (१३.४), अमरावती ३०.६ (१४.९), भंडारा २९ (१४), बुलडाणा २८ (१३.४), ब्रह्मपुरी ३१.२ (१२), चंद्रपूर २८.८ (१३.५), गडचिरोली २८.८ (१३), गोंदिया २९.२ (१२.२), नागपूर २९.९ (१२), वर्धा २९ (१३.४), वाशीम २९ (-), यवतमाळ ३० (-).

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

विषुववृत्तीय हिंद महासागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने मंगळवारी (ता.२६) वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली पुदुच्चेरीपासून ७१० किलोमीटर, चेन्नईपासून ८०० किलोमीटर आग्नेयेकडे होती. आज (ता. २७) चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारपर्यंत (ता. २९) तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचा अंदाज आहे.

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

परभणी (कृषी) ८, निफाड ८.८, धुळे ९, अहिल्यानगर ९.७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT