Winter Season Agrowon
हवामान

Cold Weather Update : राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज

Winter Season : पावसाने उघडीप देताच राज्यात आकाश निरभ्र होऊ लागले आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढू लागला आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाने उघडीप देताच राज्यात आकाश निरभ्र होऊ लागले आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली घसरले आहे. आज (ता. ९) राज्यात किमान तापमानात घट होण्याचा आणि थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. रविवारी (ता. ८) हरियानाच्या ‘हिसार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर राज्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव येथे पारा पुन्हा १० अंशांपर्यंत घसरला आहे. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३४.५ अंश तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असून, उन्हाचा चटका कमी-अधिक होत आहे. आज (ता. ९) आकाश निरभ्र राहण्यासह किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होत थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र होणार ठळक

विषुववृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. ७) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. आज (ता. ९) ही प्रणाली ठळक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र बुधवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

रविवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३.७ (१६.४), अहिल्यानगर ३०.९ (१५.५), धुळे ३२ (९.५), जळगाव ३१.१ (१०), जेऊर ३४.५ (-), कोल्हापूर ३०.२ (२१.८), महाबळेश्‍वर २५.८ (१५.७), मालेगाव २७.६ (१८), नाशिक २९.५ (१२.५), निफाड २८.४ (११.७), सांगली ३० (२१.५), सातारा ३२.८ (१८), सोलापूर ३२.६ (२२.१), सांताक्रूझ ३३.७ (१७.२), डहाणू ३१.१ (१६.१), रत्नागिरी ३३.६ (२१.४),

छत्रपती संभाजीनगर ३१.४ (१६), धाराशिव ३०.२ (१९.४), परभणी ३२.४ (१८.५), परभणी कृषी विद्यापीठ ३१.९ (१६), अकोला ३३.७ (१७), अमरावती ३२.६ (१८.९), भंडारा ३०.६ (२०), बुलडाणा २९.५ (१७), ब्रह्मपुरी ३१.६ (१९.१), चंद्रपूर ३०.६ (१६.८), गडचिरोली ३० (१७), गोंदिया २९ (१९.६), नागपूर ३१.२ (१९.२), वर्धा ३२.५ (२०.२), वाशीम ३२.४ (१९.२), यवतमाळ ३२.

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ९.५, जळगाव १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

Cotton Farmers Crisis: कापूस वेचणी दर स्थिर, मजूरटंचाईची समस्या मात्र कायम! शेतकऱ्यांसमोर नवे संकट

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

SCROLL FOR NEXT