Weather Update  Agrowon
हवामान

Weather Forecast : थंडीची चाहूल, अन्‌ पावसाला पोषक हवामानही !

Winter Season : वादळी पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी गारठा वाढू लागला असून, धुक्याच्या चादरीसह दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

अमोल कुटे

Pune News : वादळी पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी गारठा वाढू लागला असून, धुक्याच्या चादरीसह दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील 'डाना' तीव्र चक्रीवादळ जमीनीवर येताच निवळून गेले आहे. उत्तर ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आकाश निरभ्र झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत असल्याने, उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येत आहे. यातच पहाटेच्या वेळी हवेत गारठा वाढू लागला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ, अकोला, ब्रह्मपूरी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक, तर जळगाव, वाशीम, परभणी येथे ३४ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.२ (१७.४), अहिल्यानगर ३२.० (१६.३), जळगाव ३४.८ (१८.३), कोल्हापूर ३१.४ (२१.२), महाबळेश्वर २९.४ (१५.६), मालेगाव ३१.६ (२१.२), नाशिक ३२.८ (१७.०), निफाड ३२.० (१६.५), सांगली ३२.९ (२०.३), सातारा ३१.९ (१७.८), सोलापूर ३५.४ (१९.३), सांताक्रूझ ३५.३ (२२.५), डहाणू ३३.८ (२२.५),

रत्नागिरी ३२.८ (२३.८), छत्रपती संभाजीनगर ३३.० (१९.०), बीड ३१.४ (-), धाराशिव - (१८.८), परभणी ३४.० (१९.९), अकोला ३५.३ (२०.६), अमरावती - (१८.३), भंडारा ३०.० (२१.०), बुलढाणा ३१.० (२१.७), ब्रह्मपूरी ३५.० (२०.२), चंद्रपूर ३३.२ (२०.४), गडचिरोली ३३.४ (२१.०), गोंदिया ३२.९ (१८.९), नागपूर ३३.५ (२०.१), वर्धा ३३.८ (१९.८), वाशीम ३४.६ (-), यवतमाळ ३३.० (१७.५).

विजांसह पावसाची शक्यता :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड.

३४ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३५.४, सांताक्रूझ ३५.३, अकोला ३५.३, ब्रह्मपूरी ३५, जळगाव ३४.८, वाशीम ३४.६, परभणी ३४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT