Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा

Cold Wave Update : मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळ तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. आज (ता. २८) मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका तीव्र होऊ लागला आहे. बुधवारी (ता. २७) पंजाबमधील ‘अदामपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालय निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे नीचांकी ८.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, पुणे आणि अहिल्यानगर येथे ९ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा कमी होत आहे.

थंडीचा कडाका वाढताच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा देखील ३० अंशाच्या खाली आला आहे. बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३३.४ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २८) आणि उद्या (ता. २९) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे येथे थंडीची लाट येणार असल्याने सतर्कतेचा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात किमान तापमानात आणखी घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८ (९.९), अहिल्यानगर २७.८ (९.४), धुळे २९ (८.३), जळगाव ३०.२ (११.७), कोल्हापूर २८.२ (१५.५), महाबळेश्‍वर २२.१ (११.८), मालेगाव २७ (१२.८), नाशिक २८.१ (१०.६), निफाड २७.८ (८.३), सांगली २९.५ (१४.४), सातारा २८.६ (१२), सोलापूर ३१.७ (१५.२), सांताक्रूझ ३३.६ (१७.६), डहाणू ३२.२ (१७.५),

रत्नागिरी ३३.४ (२१), छत्रपती संभाजीनगर २८.६ (१२.२), धाराशिव - (१४), परभणी २८.१(११.६), परभणी कृषी विद्यापीठ २८ (८.९), अकोला ३०.८ (१३.६), अमरावती ३०.४ (१४.१), भंडारा २९.२ (१३.६), बुलडाणा २८.६ (१३.६), ब्रह्मपुरी ३१.२ (१२.३), चंद्रपूर २९.२ (१३.८), गडचिरोली २८ (१३.६), गोंदिया २९.४ (११.९), नागपूर २९.८ (११.७), वर्धा २८.९ (१३.५), वाशीम २९ (-), यवतमाळ २९ (-).

बंगालच्या उपसागरात घोंघावणार चक्रीवादळ

विषुववृत्तीय हिंद महासागरातील कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढून मंगळवारी (ता.२६) वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. बुधवारी (ता. २७) ही प्रणाली पुद्दुचेरीपासून ४७० किलोमीटर, चेन्नईपासून ५५० किलोमीटर आग्नेयेकडे होती. आज (ता. २८) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उद्यापर्यंत (ता. २९) तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे.

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ८.३, निफाड ८.३, परभणी (कृषी) विद्यापीठ ८.९, अहिल्यानगर ९.४, पुणे ९.९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT