Maharashtra Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्यात थंडीला पुन्हा सुरुवात; काही भागात किमान तापमान पुन्हा १० अंशाच्या खाली

Maharashtra Cold Wave : गेली दोन आठवडे गायब झालेली थंडी पुन्हा जावणत आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा कमी होत आहे. काही ठिकाणी पुन्हा तापमान १० अंशाच्या खाली दिसत आहे.

Anil Jadhao 

Pune News : गेली दोन आठवडे गायब झालेली थंडी पुन्हा जावणत आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा कमी होत आहे. काही ठिकाणी पुन्हा तापमान १० अंशाच्या खाली दिसत आहे. राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

आज राज्यातील अनेक भागात सकाळी थंडीचा कडाका जाणवला. आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वात कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस तापमान होते. तर मोहोळ येथेही तापमानात घट होऊन ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यातील अनेक ठिकाणी आज किमान तापमान कमी झाले आहे.

उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी जास्त होत आहे. आज मध्य प्रदेशातील नवगाव येथे सपाट भूभागावरील नीचांकी ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सर्वाधिक तापमान केरळमधील कन्नूर येथे ३५.८ अंश सेल्सिअस होते. दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी कमाल तापमान कायम दिसत आहे. तर उत्तर भारतात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील काही भागात सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. तसेच सकाळी थंडीही वाढत आहे. किमान तापमानात अनेक भागात घट झाली. तर दुपारी जाणवत असलेला उकाडाही काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT