Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : राज्यात गारठा वाढला; थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

Maharashtra Weather Forecast : उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने राज्यात गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने राज्यात गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने दोन दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालयालगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. यातच उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका सातत्याने कमी-अधिक होत आहे. शनिवारी (ता. ४) मध्य प्रदेशातील मंडला येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आकाश निरभ्र होत, स्वच्छ सूर्य प्रकाश जमिनीवर येत असल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी गारठा आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे.

शनिवारी (ता. ४) धुळे येथील परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ६.६ अंश तापमान नोंदले गेले. तसेच धुळे, निफाड, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नागपूर, गोंदिया येथे किमान तापमान १० अंशाखाली आले होते. काही ठिकाणी धुक्यासह दव पडल्याचे दिसून आले.

दरम्यान, कमाल तापमानात वाढ झाल्याने शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंच्या २४ तासांत सांताक्रुझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, डहाणू येथे ३५.४ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. ५) राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहणार असून, उद्यापासून गारठा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३०.०---९.६

अहिल्यानगर---३२.१---७.७

धुळे---३१.०---६.८

जळगाव---३०.४---९.६

जेऊर---३२.५---११.०

कोल्हापूर---३०.८---१५.३

महाबळेश्वर---२६.२---१३.८

मालेगाव---(-)---१२.०

नाशिक---३०.१---१०.१

निफाड---३०.०---७.३

सांगली---३२.८---१३.२

सातारा---३२.६---१२.५

सोलापूर---३४.२---१३.६

सांताक्रूझ---३६.०---१६.२

डहाणू---३५.६---१६.७

रत्नागिरी---३४.३---१८.९

छत्रपती संभाजीनगर---३१.३---११.६

धाराशिव---(-)---१२.३

परभणी---३०.८---११.०

परभणी (कृषी)---२९.६---६.६

अकोला---३३.२---११.७

अमरावती---३२.४---११.१

भंडारा---२९.०---१४.४

बुलडाणा---३१.७---१३.४

ब्रह्मपुरी---३२.२---११.३

चंद्रपूर---३०.४---(-)

गडचिरोली---३०.०---१०.६

गोंदिया---२९.०---९.५

नागपूर---३१.१---९.०

वर्धा---३१.०---११.०

वाशीम---३१.८---१५.६

यवतमाळ---३०.६---११.५

१० अंशापेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

परभणी (कृषी) ६.६, धुळे ६.८, निफाड ७.३, अहिल्यानगर ७.७, नागपूर ९, गोंदिया ९.५, पुणे ९.६, जळगाव ९.६,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT