Winter Season Agrowon
हवामान

Weather Update: राज्यात थंडीचा कडाका कमीच राहणार; उत्तर भारतात थंडी वाढली

Winter Weather Forecast: उत्तर भारतातील काही भागात थंडी वाढली आहे. मात्र राज्यातील थंडी आजही कमीच होती. दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: उत्तर भारतातील काही भागात थंडी वाढली आहे. मात्र राज्यातील थंडी आजही कमीच होती. दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यात पुढील काही दिवस थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे. तर किमान तापमानातही चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. तर अनेक भागात सकाळी उशीरार्यंत दाट धुके दिसून येत आहे. आज राजस्थानातील फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर भारतात थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम सोमवारी (ता. २७) संपुष्टात आला. वायव्य भारतात १५० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत.

राज्यात उत्तर भारतातून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले आहेत. त्याचा राज्यातील थंडीवर त्याचा परिणाम दिसत आहे. राज्यातील किमान तापमान १० अंशाच्या पुढेच आहे.

आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. राज्यात पुढील काही दिवस किमान तापमान जास्तच राहण्याचा अंदाज आहे. तर थंडीतही चढ उतार दिसून येतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT