Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात थंडीची लाट

Winter Weather Update : उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांनी स्वारी केल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांनी स्वारी केल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. सोमवारी (ता. १६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे हंगामातील नीचांकी ४ अंश तापमान नोंदविले गेले. गोठविणाऱ्या थंडीमुळे बोरगाव (जि. लातूर) येथे दवबिंदूंचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दिसून आले.

लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होणार आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्याने सोमवारी (ता. १६) हरियानाच्या ‘हिस्सार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून, किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्याने तसेच सरासरी किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने धुळे, परभणी, जेऊर, अहिल्यानगर, निफाड, गोंदिया, बीड, पुणे, जळगाव, नागपूर येथे थंडीची लाट आली आहे. मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अकोला, भंडारा, ब्रह्मपुरी, गडचिरोली येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला.

दरम्यान, सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम असल्याने दिवसा देखील गारठा जाणवत आहे. आज (ता. १७) मध्य महाराष्ट्रातील राज्यातील थंडी कायम राहणार असली तरी काही ठिकाणी किमान तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदविले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २९.६ (७.८), अहिल्यानगर ३० (५.५), धुळे २९ (४), जळगाव २९ (७.८), जेऊर - (५), कोल्हापूर २९.२ (१४.१), महाबळेश्वर २७.९ (१३.५), मालेगाव २४.६ (९.६), नाशिक २८.४ (९.४), निफाड २७.८ (५.६), सांगली ३०.४ (१२.७), सातारा ३२.६ (११.५), सोलापूर ३२.६ (११.५), सांताक्रूझ ३५.४ (१४),

डहाणू ३२.१ (१५), रत्नागिरी ३४.८ (१७.८), छत्रपती संभाजीनगर २९ (९.६), बीड २८.५ (७.५), धाराशिव - (९.४), परभणी २८.४ (८.२), परभणी कृषी विद्यापीठ २७.५ (४.१), अकोला ३१.८ (९.९), अमरावती ३१.२ (१०.६), भंडारा ३१.४ (१०), बुलडाणा २८.७ (११.४), ब्रह्मपुरी ३० (९.९), चंद्रपूर २७.६ (१०.४), गडचिरोली २७.२ (९), गोंदिया २७.६ (७.४), नागपूर २८.९ (८.४), वर्धा २९ (९.४), वाशीम २७.६ (१३), यवतमाळ २९.६ (-).

थंडीची तीव्र लाट असलेली ठिकाणे :

धुळे ४, परभणी (कृषी) ४.१, जेऊर ५, अहिल्यानगर ५.५, निफाड ५.६, गोंदिया ७.४, बीड ७.५, पुणे ७.८, जळगाव ७.८, नागपूर ८.४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT