Winter Chill Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave : थंडीच्या लाटेने हुडहुडी कायम

Maharashtra Cold Weather : उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांनी महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांनी महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने हुडहुडी कायम आहे. बुधवारी (ता. १८) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ५ अंश तापमान नोंदले गेले. आजपासून (ता. १९) राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही प्रणाली आज (ता. १९) उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्याने बुधवारी (ता. १८) राजस्थानच्या ‘चुरू’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही थंडीची तीव्रता कायम असल्याने किमान तापमान १० अंशांच्या खाली येत, सरासरी तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने धुळे, जेऊर, परभणी (कृषी), अहिल्यानगर, निफाड, नांदेड येथे थंडीची लाट आहे. जळगाव, धाराशिव, गोंदिया, पुणे, नाशिक, बीड, नागपूर येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्याने कडाक्याची थंडी कायम आहे.

बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३४.६ अंश तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्रावर येत असले, तरी राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. आज (ता. १९) राज्यातील थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

बुधवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.३ (८.९), अहिल्यानगर २९.८ (७.४), धुळे ३० (५), जळगाव ३०.३ (८.४), जेऊर ३१ (६), कोल्हापूर २९.४ (१४.८), महाबळेश्‍वर २८.१ (१३.५), मालेगाव २६ (११), नाशिक ३०.५ (९), निफाड २७ (७.४), सांगली ३०.९ (११.६),

सातारा ३१.७ (१०.१), सोलापूर ३२.३ (१२.४), सांताक्रूझ ३४.६ (१५.४), डहाणू २७.५ (१६), रत्नागिरी ३४.४ (१७.७), छत्रपती संभाजीनगर ३०.४ (११), बीड २८.८ (९), धाराशिव - (८.६), नांदेड - (७.६), परभणी २९.१ (१०.१), परभणी कृषी विद्यापीठ २८.१ (६.१), अकोला ३२.२ (१०.८), अमरावती ३१.६ (११.५), भंडारा २७.६ (१२), बुलडाणा ३२.३ (१२.५), ब्रह्मपुरी ३१.२ (१०), चंद्रपूर २८.६ (-), गडचिरोली २८.२ (१०.६), गोंदिया २८.६ (८.८), नागपूर ३० (९.४), वर्धा ३०.५ (१०.५), वाशीम ३१.४ (-), यवतमाळ ३० (-).

थंडीची तीव्र लाट असलेली ठिकाणे : धुळे ५, जेऊर ६, परभणी (कृषी) ६.१, अहिल्यानगर ७.४, निफाड ७.४, नांदेड ७.६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT