Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : राज्यात थंडीची लाट कायम

Cold Wave : अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून, रविवारी (ता. १५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ४.१ अंश तापमान नोंदले गेले.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्यामुळे राज्याला अक्षरशः हुडहुडी भरली आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून, रविवारी (ता. १५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ४.१ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. १६) राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज (ता. १६) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होणार आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्याने रविवारी (ता. १५) पंजाबच्या ‘अदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून, किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्याने तसेच सरासरी किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने अहिल्यानगर, धुळे, निफाड, परभणी येथे गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलडाणा येथे थंडीची लाट आली आहे. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.८ अंश तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम असल्याने दिवसादेखील गारठा जाणवत आहे. आज (ता. १६) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, तर पूर्व विदर्भातील गोंदिया येथे थंडीची लाट येणार असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

रविवारी (ता. १५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २७.७ (९), अहिल्यानगर २९.८ (६.४), धुळे २८ (४.१), जळगाव २९.९ (७.९), जेऊर ३०, कोल्हापूर २९.४ (१६.३), महाबळेश्‍वर २५.८ (१२.५), मालेगाव २४.८ (१०.४), नाशिक २६.३ (१०.४), निफाड २६.२ (६.१), सांगली ३०.४ (१५.१), सातारा ३०.२ (१२.१), सोलापूर ३१.६ (१४), सांताक्रूझ ३३.५ (१६.३), डहाणू ३४.२, रत्नागिरी ३४.८ (२२),

छत्रपती संभाजीनगर २७.६ (८.८), धाराशिव २८.६ (१०), नांदेड (१०.६), परभणी २७.५ (८.६), परभणी कृषी विद्यापीठ २६.६ (४.६), अकोला २९ (९.६), अमरावती २९ (१०.५), भंडारा ३० (८), बुलडाणा २९ (१०.३), ब्रह्मपुरी ३०.८ (९.६), चंद्रपूर २७.४ (१०.६), गडचिरोली २७.६ (१०), गोंदिया २७ (७.२), नागपूर २७.९ (७), वर्धा २८ (७.४), वाशीम २७.२ (१२.२), यवतमाळ २७.५.

थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, गोंदिया.

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ४.१, परभणी (कृषी) ४.६, निफाड ६.१, अहिल्यानगर ६.४, नागपूर ७.०, गोंदिया ७.२, वर्धा ७.४.जळगाव ७.९, भंडारा ८.०, परभणी ८.६, छत्रपती संभाजीनगर ८.८, पुणे ९, अकोला ९.६, ब्रह्मपुरी ९.६, धाराशिव १०, गडचिरोली १०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT