Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Hawaman Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला; उत्तर भारतात बहुतांशी भागात थंडीची लाट कायम

Maharashtra Winter Weather : महाराष्ट्रातील येऊर येथे ०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारतातील राज्ये आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम दिसत आहे. पंजाबमध्ये थंडीचा कडाका जास्तच आहे. पंजाबमधील आदामूपरमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रातील येऊर येथे ०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

लक्षद्वीप आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता असून, सोमवारपर्यंत या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

यातच पश्‍चिमी चक्रावात आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. आज पंजाबच्या ‘अदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे ०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही अनेक ठिकाणी थंडीचा कडाका चांगलाच वाढला. राज्यातील काही भागात १० अंशाच्या दरम्यान तापमान होते. आज राज्यात जेऊर येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाल. राज्यात पहिल्यांदाच तापमान १ अंशाच्या खाली गेले. जेऊर येथे ०.९ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT