Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : उत्तर भारतात थंडीची लाट आणि दाट धुके; राज्यातील किमान तापमानात घट

Weather Update : पुढील ३ दिवस उत्तर भारतात दाट ते अतिदाट धुक्याची चादर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पुढील दोन दिवस थंड ते अतिथंड हवामान राहण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. उत्तर भारतातील काही भागात दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. तर राज्यात थंडीला पोषक हवामान असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

हवामान विभागाने पुढील ३ दिवस उत्तर भारतात दाट ते अतिदाट धुक्याची चादर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर पुढील दोन दिवस थंड ते अतिथंड हवामान राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर भारतात पुढील ३ दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. उत्तर भरतातील पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानच्या बहुतांशी भागात किमान तापमान ३ ते ७ अंशाच्या दरम्यान होते.

तर ईशान्य भारत आणि शेजारच्या पूर्वेकडील अनेक भागात तापमान १ ते ३ अंशाच्या दरम्यान होते, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

राज्यातील अनेक भागात किमान तापमानात घट झाली आहे. अनेक भागातील किमान तापमान २ ते ३ अंशाने कमी झाले, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये राज्यातील भागातील किमान तापमान आणखी घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : रायगडच्या शेतकऱ्यांना दिलासा; बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Organic Gardening : शाळेच्या परसबागेतून ७२५ रुपयांचे उत्पन्न

Farmer Crisis : शेतकरी अडचणीत, तातडीने आर्थिक मदत करा : रोहित पवार

Sugarcane Rate : हुतात्मा कारखान्याने ३८५० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी

Rajarambapu Milk Union : राजारामबापू दूध संघाचा मराठवाड्यात विस्तार

SCROLL FOR NEXT