Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Hawaman Update : राज्यातील थंडी वाढण्याची शक्यता; राज्यात अनेक भागात तापमानात घट; उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम

Maharashtra Weather : राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा एकदा जाणवायला सुरुवात झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढू लागला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा एकदा जाणवायला सुरुवात झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला आहे. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारताला थंडीने हुडहुडी भरली आहे. पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. आज पंजाबमधील अमृतसर येथे आणि राजस्थानमधील उदयपूर दाबोक येथे देशातील सर्वात कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दक्षिण भारतात उन्हाचा चटका वाढला आहे. रायलसिमा भागातील अनंतपूर येथे देशातील सर्वात जास्त ३४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातही थंडी वाढायला सुरुवात झाली. महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असून, उन्हाचा चटका कमी-अधिक होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील थंडी जास्त दिसत आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

विषुववृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली पुढील २४ तासांत ठळक होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT