Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात गारठा वाढला

Cold Season : राज्यातील ढगाळ हवामान निवळू लागताच किमान तापमानात घट होऊ लागली आहे. पहाटेच्या वेळी काही प्रमाणात धुके आणि दव पडल्याची स्थिती कायम आहे.

Team Agrowon

Weather Foarcasting : पुणे : राज्यातील ढगाळ हवामान निवळू लागताच किमान तापमानात घट होऊ लागली आहे. पहाटेच्या वेळी काही प्रमाणात धुके आणि दव पडल्याची स्थिती कायम आहे.

विदर्भात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. उर्वरित राज्यातही गारठा हळूहळू वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात आकाश निरभ्र होत असून, पहाटे गारठा तर दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.

तर कमी-अधिक प्रमाणात धुक्यासह दव पडल्याचे चित्र कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशाची घट होण्याची शक्यता असल्याने थंडी हळूहळू वाढत जाणार आहे.

सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान २४ ते ३१ अंशांच्या दरम्यान होते. विदर्भात किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली घसरला आहे. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.० (१५.८), जळगाव ३०.० (१५.३), कोल्हापूर २९.६ (१९.५), महाबळेश्वर २४.६ (१५.५), नाशिक २९.८ (१६.२), निफाड २८.५ (१३.२), सांगली ३०.३ (१८.५), सातारा ३०.७ (१७.४), सोलापूर ३२.४(१७.८), सांताक्रूझ ३३.५ (२१.६), डहाणू ३०.७ (२०.२), रत्नागिरी ३५.६ (२३.१), छत्रपती संभाजीनगर २८.६ (१५.१), नांदेड २८.८ (१६.२), परभणी २८.९ (१५.१), अकोला २९.८ (१५.६), अमरावती २८.४ (१४.२), बुलडाणा २७.५ (१४.४), ब्रह्मपुरी २७.८ (१४.४), चंद्रपूर २८.४(१३.२), गडचिरोली २९.४ (१४.६), गोंदिया २७.० (१३.०), नागपूर २८.२(१३.८), वर्धा २८.९(१४.४), वाशीम २८.४ (१३.६), यवतमाळ ३०.५ (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT