Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात थंडीला पोषक स्थिती; उत्तर भारतात थंडीची लाट कायम

Weather Update : उत्तर भारतातील अनेक भागात थंडी कायम असून काही भागात धुक्याची लाटही कायम आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानात घट दिसून आली. त्यामुळे थंडीही वाढली आहे. तर उत्तर भारतातील अनेक भागात थंडी कायम असून काही भागात धुक्याची लाटही कायम आहे. 

उत्तर भारतातील अनेक भागात किमान तापमान कमीच आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्लीच्या बहुतांशी भागात किमान तापमान २ ते ५ अंशाच्या दरम्यान होते. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडच्या बहुतांशी भागात किमान तापमान ६ ते १० अंशाच्या दरम्यान होते.

तर ईशान्य भारत आणि शेजारच्या भागात किमान तापमान १ ते ४ अंशाच्याही पातळीवर पोचले होते. हरियानातील हिस्सार येथे सर्वात कमी १.१ अंश तापमानाची नोंद झाली. 

उत्तर भारतात पुढील ५ दिवस दाट ते अतिदाट धुक्याची चादर कायम राहील. तर पुढील २ दिवस उत्तर भारतात अतिथंडी राहू शकते. त्यानंतर थंडी कमी होत जाईल. तसेच पुढील पाच दिवस ईशान्य भारतात अतिथंडीची लाट दिसू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी परतल्याचे दिसते. बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात घट दिसून आली. कमाल तापमानाची पातळी मात्र कायम राहिल्याचे दिसते. राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस थंडी कायम राहू शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : भाजप सरकारमुळे शेतकऱ्यांवर कर्ज वाढले; काँग्रेसच्या खासदार शैलजा कुमारी यांचा आरोप

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; राज्यातील बहुतांशी भागात किमान आणि कमाल तापमानातील वाढ कायम

Farmers Protest: ...तर शेतकरी ‘ट्रॅक्टर’ घेऊन मुंबईवर धडकणार

India US Trade Deal: व्यापार करार की लोटांगण?

Gram Panchayat Administrator: अकोला जिल्ह्यातील सव्वादोनशे ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक राज’

SCROLL FOR NEXT