Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast : रविवारपर्यंत ढगाळ हवामान राहणार; आजपासून ३ दिवस काही ठिकाणी पावसाची काहिशी शक्यता

Weather Update : राज्यात पुन्हा थंडी वाढायला सुरुवातही होऊ शकते, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात आजही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर राज्यात रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकते आणि काही ठिकाणी पावसाची किंचित शक्यताही आहे. तर सोमवारपासून राज्यात पुन्हा थंडी वाढायला सुरुवातही होऊ शकते, असे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

तामिळनाडू राज्यात घुसलेले चक्रीवादळ भू-भागावरच क्षीणतेकडे झुकले. त्यामुळे कर्नाटक राज्य ओलांडून जरी त्याच्या अवशेषांनी अरबी समुद्रात प्रवेश केला तरीदेखील ते तीव्र होऊ शकले नाही. ते विरळ होवून सोमलियाकडे निघून गेले. त्यामुळे अपेक्षित भाकिताप्रमाणे महाराष्ट्रावर त्याचा विशेष असा वातावरणीय परिणाम जाणवला नाही, असे खुळे यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून ३ दिवस म्हणजे रविवारपर्यंत ढगाळ वातावरण राहू शकते. तर सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये व लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असेही श्री. खुळे यांनी सांगितले. 

सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात दुपारी ३ वाजताचे कमाल तापमान सरासरीइतके म्हणजे ३० अंश सेल्सिअस तर पहाटे ५ वाजेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने अधिक म्हणजे २० अंशाच्या दरम्यान जाणवत आहे. तर मुंबईसह कोकणात दुपारी ३ वाजेचे कमाल तापमान ३१ ते ३४ तर पहाटे ५ वाजेचे किमान तापमान २४ ते २६ अंशाच्या दरम्यान जाणवत आहे.  त्यामुळे महाराष्ट्रात एकाकी थंडी कमी झाली आहे, असेही श्री. खुळे यांनी स्पष्ट केले.

सोमवारपासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता जाणवते. पुढील आठवड्यात सोमवार (ता.९) ते शुक्रवार (ता.१३) पर्यंतच्या सहा दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत पहाटे ५ वाजेचे किमान तापमानाचा पारा पुन्हा १० ते १२ अंशांपर्यंतही घसरू शकतो. मुंबईसह कोकणातील पहाटे ५ वाजेचे किमान तापमानही सध्या पेक्षा कमी होऊन १८ ते २० अंशापर्यंत घसरण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे त्या सहा दिवसात चांगल्या थंडीची अपेक्षा आहे, असेही खुळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

Soybean Crop Disease Management: सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना

SCROLL FOR NEXT