Foggy Weather Agrowon
हवामान

Weather Update : चक्रीवादळ निवळल्यानंतरही राज्यात ढगाळ हवामान; धुक्यात हरवली पहाट

Foggy Weather : बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळ निवळल्यानंतरही राज्यात ढगाळ हवामान आहे. गुरुवारी (ता. ७) पहाटे राज्याच्या अनेक भागांत दाट धुके पसरल्याचे दिसून आले.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळ निवळल्यानंतरही राज्यात ढगाळ हवामान आहे. गुरुवारी (ता. ७) पहाटे राज्याच्या अनेक भागांत दाट धुके पसरल्याचे दिसून आले. आज (ता. ८) राज्याच्या किमान व कमाल तापमानातील चढ-उतार होण्याची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले.

बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ चक्रीवादळ निवळल्यानंतर विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. तर आग्नेय अरबी समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

राज्यात दिवसभर ढगाळ हवामान व पहाटेपासूनच धुक्याची दुलई, दव पडल्याचे चित्र होते. अनेक भागांत सकाळी उशिरा सूर्यदर्शन झाले. ढगांच्या आच्छादनामुळे कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम आहेत.

गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बुहतांश ठिकाणी कमाल तापमान २२ ते ३४ अंशांच्या दरम्यान होते. किमान तापमानात चढ-उतार होत असून, जोरदार थंडीची प्रतीक्षा आहे. महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.५ (१५.७), जळगाव २७.७ (१७.४), कोल्हापूर २९.१ (१९.९), महाबळेश्‍वर २२.२ (१३.६), नाशिक २५.७ (१६.८), निफाड २९.८ (१५.५), सांगली २७.७ (१८.८), सातारा २७.८ (१७.२), सोलापूर २५ (१९.२), सांताक्रूझ ३३.१ (२२.३), डहाणू ३३ (२४.४), रत्नागिरी ३४.३ (२३),

छत्रपती संभाजीनगर २३.३ (१८), नांदेड २५.८ (१८.८), परभणी २२.२ (१९.३), अकोला २५.७ (१९.७), अमरावती २२.८ (१७.७), बुलडाणा २३.४ (१८.४), ब्रह्मपुरी २२.६ (१८.६), चंद्रपूर २२.४ (१७), गडचिरोली २२.८ (१८.६), गोंदिया २१.७ (१७.६), नागपूर २२.१ (१८.९), वर्धा २२.९ (१८.९), वाशीम २६.८ (१७.२), यवतमाळ २२ (१८).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT