Cloudy Weather Agrowon
हवामान

Weather Update : ढगाळ हवामानाचा अंदाज कायम

Cloudy Weather : ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. धुके आणि ढगाळ हवामानाचे मळभ कायम राहणार असल्याने आहे.

अमोल कुटे

Pune News : ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. धुके आणि ढगाळ हवामानाचे मळभ कायम राहणार असल्याने आहे. पुढील काही दिवस किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या कोमोरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुक्याचे साम्राज्य कायम आहे.

सोमवारी (ता. १३) पंजाबच्या अमृतसरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेले काही राज्याच्या बऱ्याच भागात सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहे.

यातच अंशतः ढगाळ हवामानामुळे झाल्याने गारठा कमी झाला आहे. सोमवारी (ता. १३) धुळे ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे.

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंच्या २४ तासांत सोलापूर येथे ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र उद्यापासून (ता. १५) तीन दिवस किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---२९.२---१७.१

अहिल्यानगर---२७.८---१६.७

धुळे---२६.५---८.५

जळगाव---२८.५---१४.१

जेऊर---३१.५---१६.५

कोल्हापूर---३०.४---१९.१

महाबळेश्वर---२४.६---१४.४

मालेगाव---२६.२---१३.०

नाशिक---२७.४---१४.९

निफाड---२९.८---१३.०

सांगली---३०.५---१८.१

सातारा---२९.६---१८.१

सोलापूर---३२.०---१८.३

सांताक्रूझ---३०.६---१९.८

डहाणू---२९.५---१७.६

रत्नागिरी---३०.५---२०.०

छत्रपती संभाजीनगर---२७.२---१५.८

धाराशिव---निरंक---१५.८

परभणी---२९.५---१६.१

परभणी (कृषी)---२९.०---१७.०

अकोला---२८.९---१७.४

अमरावती---२७.४---१५.०

भंडारा---२७.४---१५.०

बुलडाणा---२६.५---१५.०

ब्रह्मपुरी---३०.९---१६.४

चंद्रपूर---२९.०---निरंक

गडचिरोली---२८.६---१३.६

गोंदिया---२७.८---१६.०

नागपूर---२९.०---१६.६

वर्धा---२८.०---१७.४

वाशीम---२६.६---१९.२

यवतमाळ---२८.२---१७.५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT