Cloudy Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Cold: काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज; उत्तर भारतात किमान तापमानात वाढ

Weather Update : राज्यातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचे दिसते.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचे दिसते. तर उत्तर भारतात थंडी कायम असून किमान तापमानात काहीसे चढ उतार कायम आहेत.

राज्यातील अनेक भागात थंडीत चढ उतार सुरु आहेत. आज अनेक भागात किमान तापमानात वाढ झाली होती. मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात पुढील आठवड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते.

तर तुरळक ठिकाणी एकदम हलका पाऊस पडून शकतो. पण अशी शक्यता कमी दिसते. मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहीत पावसाची शक्यता दिसत नाही, असे हवामान विभागाचे माजी शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. पंजाब, हरियाना, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये बहुतांशी भागात किमान तापमान ६ अंंश सेल्सिअस ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

तर दिल्ली, दक्षिण राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील बहुतांशी भागात किमान तापमान १० अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. किमान तपमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने जास्त होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT