Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Winter Weather Forecast : तापमानात काहिसे चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहिशी वाढ दिसून आली. मात्र अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. राज्यातील अनेक भागात आजही १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. तापमानात काहिसे चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. धुळे येथे किमान तापमानाचा पारा १०.५ अंशांवर होता. आजपासून राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

आग्नेय अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम आहे. आज हरियानातील हिस्सार आणि राजस्थानमधील सिकर येथे देशाच्या सपाट भुभागावरील निचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील बहुतांशी भागात गारठा वाढला. निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथे सातत्याने निचांकी तापमानाची नोंद होत आहे. आजही धुळे येथे निचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ येथे उच्चांकी ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: राज्यात पावसाला पोषक हवामान

Soybean Seeds Fraud: पश्‍चिम विदर्भात सोयाबीन बियाण्यांचा ‘फसवा खेळ’!

Soybean Price: सोयाबीनची झेप हमीभावापुढे; दर सात हजारांवर!

Farmers Income Growth: निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ

Bamboo Plantation Campaign: एक लाख बांबू लागवड मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

SCROLL FOR NEXT