Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्याच्या किमान तापमानात १ ते २ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर, उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा वाढला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमानाचा पारा १०.५ अशांवर आहे. आज (ता. २४) राज्याच्या किमान तापमानात १ ते २ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. तर, उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. शनिवारी (ता. २२) हरियानातील हिस्सार आणि राजस्थानातील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत असून, शनिवारी (ता. २३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.५ अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली आले आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली आला आहे. मात्र कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमाल तापमान अद्यापही ३० अंशांच्या पुढे आहे. शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३४.७ अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. २४) किमान तापमानात चढ-उतार होण्याची, तसेच राज्याच्या उत्तर भागात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे २९.७ (१३.१), अहिल्यानगर २९.९ (१२.४), धुळे - (१०.५), जळगाव ३०.३ (१२.८), कोल्हापूर २९.६ (१७.५), महाबळेश्वर २६.६ (१३.८), मालेगाव २७.२ (१४.०), नाशिक २९.० (१२.९), निफाड २७.६ (११.५), सांगली ३०.९ (१५.४), सातारा ३०.७ (१४.२), सोलापूर ३२.३ (१७.०), सांताक्रूझ ३४.७ (१९.१), डहाणू ३२.७ (१९.५),

रत्नागिरी ३३.४ (१९.६), छत्रपती संभाजीनगर २९.५ (१३.९), धाराशिव - (१४.२), नांदेड - (१३.५), परभणी २९.४ (१४.५), परभणी कृषी विद्यापीठ २८.५ (१२.०), अकोला ३१.० (१६.४), अमरावती २९.६ (१५.९), बुलडाणा २७.० (१५.४), ब्रह्मपुरी ३०.४ (१३.९), चंद्रपूर २८.६ (१५.२), गडचिरोली २८.६ (१४.४), गोंदिया २८.२ (१२.५), नागपूर २९.१ (१३.३), वर्धा २९.० (१४.६), वाशीम २९.० (-), यवतमाळ ३०.० (-).

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत

विषुववृत्तीय हिंद महासागरातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे या भागात शनिवारी (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. वायव्य आणि उत्तर दिशेकडे सरकताना दोन दिवसांत या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

१३ अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे १०.५, निफाड ११.५, परभणी (कृषी) १२, अहिल्यानगर १२.४, गोंदिया १२.५, जळगाव १२.८, नाशिक १२.९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT