Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम

Rain Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News : नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात अद्यापही गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रात तसेच दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. गुरुवारी (ता.३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील राजापूर येथे ५० मिलिमीटर, कणकवली येथे ३० मिलिमीटर, लांजा आण वैभववाडी येथे १० मिलिमीटर, मध्य महाराष्ट्रातील पंढरपूर येथे २० मिलिमीटर, तर मराठवाड्यातील देगलूर येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान होत आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. पहाटे गारठा जाणवत असला तरी अद्याप गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे. गुरुवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.७ अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे ३६ अंश, तर जळगाव, सोलापूर, सांताक्रूझ, वर्धा येथे ३५ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. ३१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३.२ (२०.४), अहिल्यानगर ३२.९ (२०.५), जळगाव ३५.७ (१८), कोल्हापूर ३१.६ (२३.२), महाबळेश्वर २८.६ (१७.६), मालेगाव ३२.२ (२०), नाशिक ३३.५ (१९), निफाड ३३.१ (१८), सांगली ३२.४ (२२.८), सातारा ३१.७ (२१.४), सोलापूर ३५.२ (२४.१), सांताक्रूझ ३५.१ (२५.३), डहाणू ३३.५ (२४.४), रत्नागिरी ३२.२ (२४.३), छत्रपती संभाजीनगर ३३ (२०.४), बीड - (२०), परभणी ३४.७ (२३), अकोला ३५.९ (२१.९), अमरावती ३६ (२२.६), भंडारा ३४ (२२.४), बुलडाणा ३२.३ (२०.४), ब्रह्मपुरी ३६.७ (२२.९), चंद्रपूर ३४.४ (२०.६), गडचिरोली ३२.४ (२१), गोंदिया ३४.६ (२१.२), नागपूर ३४.७ (२२.५), वर्धा ३५ (२३.६), वाशीम ३४.६ (-), यवतमाळ ३४ (२२).

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव, लातूर.

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : ब्रह्मपुरी ३६.७, अमरावती ३६, अकोला ३५.९, जळगाव ३५.७, सोलापूर ३५.२, सांताक्रूझ ३५.१, वर्धा ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान

Agriculture Department Inspection: खत-बियाणे विक्रेत्यांना दणका

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT