Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

IMD Forecast: आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: पावसाच्या उघडिपीमुळे कमाल तापमानाचा पारा तिशीपार असून, उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली मध्य प्रदेशाकडे सरकत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील बिकानेरपासून दातीया, तीव्र कमी दाबाचे केंद्र, देहरी, पुरूलिया, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, परभणीतील सेलू येथे राज्यातील उच्चांकी १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर, धाराशिव, जालना जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळला. विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.२ अंश तापमान नोंदले गेले. ब्रह्मपुरी, सोलापूर, जेऊर, धुळे येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १८) सिंधुदुर्गासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १७) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३०.२---२२.५

अहिल्यानगर---३२.२---२२.७

‎‎धुळे---३४.०---२०.४

जळगाव---३२.२---२२.७

जेऊर---३४.०---२१.०

‎‎कोल्हापूर---२९.२---२२.९

‎महाबळेश्‍वर---२०.१---१७.९

मालेगाव---३३.४---२२.६

‎‎नाशिक---३०.४---२२.४

‎निफाड---३१.६---२२.२

‎सांगली---३०.६---२२.७

‎सातारा---२९.२---२२.५

‎सोलापूर---३४.१---२४.८

‎सांताक्रूझ---३१.७---२७.५

डहाणू---३३.२---२६.१

‎रत्नागिरी---३०.१---२६.५

‎छत्रपती संभाजीनगर---३२.७---२४.०

‎धाराशिव---३१.९---२०.८

‎परभणी---३२.१---२२.८

परभणी (कृषी)---३२.२---निरंक

‎‎अकोला---३३.६---२५.५

अमरावती---३१.०---२४.१

‎भंडारा---३१.०---२४.०‎‎

बुलडाणा---३१.६---२३.६

‎ब्रह्मपुरी---३४.०---२५.६

‎चंद्रपूर---३४.२---२५.०

‎गडचिरोली---३१.०---२४.०

‎गोंदिया---२८.५---२४.८

‎नागपूर---३२.४---२५.७

‎वर्धा---३३.०---२५.६

‎वाशीम---३१.२---२३.२

‎यवतमाळ---३३.०---२४.४

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

Soil Mulching: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन करताना काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT