Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Rain Forecast : राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा चटका काहीसा कमी झाल्याने कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या खाली घसरला आहे. मंगळवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३४.८ अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूर आणि सांताक्रूझ येथे ३४ अंश तापमान नोंदले गेले.

राज्याच्या काही भागात दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारी ढग दाटून येत वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.३, अहिल्यानगर २८.९, जळगाव ३२.८, कोल्हापूर २९.७, महाबळेश्वर २६.५, मालेगाव ३१.२, नाशिक ३०.४, निफाड २९, सांगली ३०.९, सातारा ३१, सोलापूर ३४.४, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३३.१, रत्नागिरी ३२.५, छत्रपती संभाजीनगर ३०.३, बीड २८.०, परभणी ३०.६, अकोला ३३.३, अमरावती ३२.४, भंडारा ३२, बुलडाणा ३०.६, ब्रह्मपुरी ३२.६, चंद्रपूर ३२.८, गडचिरोली ३०.६, गोंदिया ३३.२, नागपूर ३२.९, वर्धा ३२.५, वाशीम ३४.८, यवतमाळ ३२.५

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

३४ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे

वाशीम ३४.८, सोलापूर ३४.४, सांताक्रूझ ३४.४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT