Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता: राज्यात गारवा वाढला

Weather Update : हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Rain Alert : राज्यात बहुतांशी भागात थंडी जाणवत आहे. राज्यातील काही ठिकाणी पावाचा शिडकावा झाला. पण जोरदार पावसाची नोंद नाही. हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली. सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असही अंदाज आहे. तर रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे.

हिमाचल प्रदेश आणि शेजारच्या भागात पश्चिमी विक्षोप चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसापाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि शेजारच्या कोकण आणि गुजरात किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्तिती आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे काही भागात पाऊस पडत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT