Weather Agrowon
हवामान

Weekly Weather : राज्यात थंडी वाढण्याची शक्यता

Maharashtra Weather : या चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. काही भागांत कडाक्याची थंडी जाणवेल.

 डॉ. रामचंद्र साबळे 

डॉ. रामचंद्र साबळे

Weather Update : महाराष्‍ट्रावर आज (ता.१५) उत्तरेकडील भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक, तर मध्य भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तशीच स्थिती बुधवार (ता. १८) पर्यंत राहील. या चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. काही भागांत कडाक्याची थंडी जाणवेल.

मात्र गुरुवार (ता.१९) ते शनिवार (ता.२१) या कालावधीत हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल होताच, थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी होईल. या आठवड्यापासून धुळे, निफाड, नाशिक भागांवर उत्तरेकडून अतिथंड वारे वाहण्यामुळे किमान तापमान ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

किमान तापमान ८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास त्याचा प्रामुख्याने पिकांवर, जनावरांवर परिणाम दिसून येतो. त्यासाठी अतिथंडीच्या काळात पिकांची व जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फळबागांमध्ये पहाटे शेकोट्या पेटवून बागेतील तापमान वाढविणे गरजेचे ठरते. या आठवड्यात दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे दुपारीही हवामान थंड व कोरडे राहील.

या आठवड्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे परिणाम पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागराचे पेरूजवळ १८ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २२ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. त्यामुळे ला निनाचा प्रभाव जाणवेल. तर हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल व ढगाळ हवामान जाणवेल.

कोकण

कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४७ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ३२ ते ३७ टक्के राहील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत २० ते २५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा वेग सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी १० कि.मी., रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यात ताशी ८ कि.मी. आणि ठाणे जिल्ह्यात ताशी ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी ९ कि.मी., तर नंदुरबार जिल्ह्यात ताशी ११ कि.मी. राहील. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, धुळे जिल्ह्यात पूर्वेकडून, तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

मराठवाडा

कमाल तापमान धाराशिव व परभणी जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशीव जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. फक्त जालना जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.

सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हवामान जास्त ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३४ ते ३८ टक्के, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ४१ ते ४२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १७ टक्के, धाराशिव जिल्ह्यात १६ टक्के, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १८ टक्के, तर लातूर व नांदेड जिल्ह्यांत १९ टक्के इतकी कमी राहील.

त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे व थंड राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात ताशी १५ कि.मी. इतका अधिक राहील. लातूर व बीड जिल्ह्यांत ताशी वेग ११ कि.मी., हिंगोली व जालना जिल्ह्यांत ताशी १० कि.मी., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ताशी ९ कि.मी., तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत ९ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३१ ते ३८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १७ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. मात्र किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आद्रता चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ४० टक्के, भंडारा जिल्ह्यात ३८ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत १३ ते १५ टक्के, तर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत १७ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ५ ते ६ कि.मी., तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे, नगर, सातारा जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील.

सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ५३ टक्के, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ४० टक्के राहील. सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ३९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ३१ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत २० ते २२ टक्के, तर सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत १५ ते १८ टक्के राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १४ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत ९ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

कृषी सल्ला

थंडीची तीव्रता लक्षात घेऊन उभ्या पिकांना सायंकाळी पाणी द्यावे.

जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधावीत.

कुक्कुटपालन शेडमध्ये बल्ब लावून शेडमधील तापमान योग्य राखावे.

आंबा झाडांना मोहर निघण्यासाठी पाण्याचा ताण द्यावा.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT