Rain Update  Agrowon
हवामान

Weather Update : दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता

Rain Forecast : कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे.

अमोल कुटे

Pune News : कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात विजांसह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आज (ता. ११) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोड क्षेत्र सक्रिय आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे.

कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना आणि विदर्भ बुलडाणा जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

आज (ता. ११) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा ‘येलो अलर्ट’' कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: विदर्भातील तीन जिल्ह्यांत अति उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Banana Variety Selection: कमी पावसातील लागवडीसाठी केळीचा कंद निवडताना काय तपासावे?

Cotton Cultivation: अकोल्यात कपाशीच्या लागवडीत वाढीची शक्यता

Online RTI Portal: क्षेत्रीय कार्यालयांतही ऑनलाइन माहिती अधिकार

Petrol Diesel Shortage: पेट्रोल- डिझेलचा साठा, मग पंपांवर रांगा का?; मुख्यमंत्री फडणवीसांनी खरं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT