Maharashtra Weather Agrowon
हवामान

Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

Rain Forecast: राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, आज (ता. १९) कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सूनने राज्य व्यापल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असून, आज (ता. १९) कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला असला, तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, साताऱ्यातील कोयना येथे उच्चांकी १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

आज (ता. १९) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

कमी दाबाचे क्षेत्र कायम

गुजरात आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे सरकले आहे. तर पश्‍चिम बंगाल आणि परिसरावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकत असून, झारखंडकडे येण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्रांमुळे गुजरात महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व भारतात ढग जमा झाले असून, पावसाला पोषक हवामान आहे.

मॉन्सूनची चाल सुरूच

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) प्रवास पुन्हा सुरू झाल्यानंतर वेग धरला आहे. बुधवारी (ता. १८) मॉन्सूनने संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, झारखंडसह, मध्य प्रदेश, बिहारचा आणखी काही भाग, राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात प्रगती केली आहे. दोन दिवसांत मॉन्सूनची आणखी प्रगती होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बुधवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)

‎---

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.८---२३.१

अहिल्यानगर---निरंक---२३.४

‎‎धुळे---३६.०---२२.५

जळगाव---३६.६---२४.७

जेऊर---३४.०---२०.५

‎‎कोल्हापूर---२९.०---२२.७

‎महाबळेश्‍वर---२०.५---१८.५

मालेगाव---३३.६---२२.६

‎‎नाशिक---३०.०---२३.२

‎निफाड---३०.२---२३.१

‎सांगली---३०.२---२३.३

‎सातारा---२८.०---२२.८

‎सोलापूर---३३.८---२३.९

‎सांताक्रूझ---३२.६---२६.१

डहाणू---३२.९---२५.४

‎रत्नागिरी---३१.२---२६.७

‎छत्रपती संभाजीनगर---३२.६---२३.८

‎धाराशिव---२९.८---२१.७

‎परभणी---३५.०---२४.०

परभणी (कृषी)---३५.०---२२.६

‎‎अकोला---३६.४---२६.५

अमरावती---३५.२---२३.९

‎भंडारा---३५.०---२४.०‎‎

बुलडाणा---३३.६---२३.४

‎ब्रह्मपुरी---३७.०---२६.६

‎चंद्रपूर---३६.०---२७.०

‎गडचिरोली---३४.०---२६.०

‎गोंदिया---३३.६---२४.८

नागपूर---३८.२---२८.२

‎वर्धा---३५.९---२६.५

‎वाशीम---३४.८---२४.८

‎यवतमाळ---३६.४---२३.४

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT