Rain Update  Agrowon
हवामान

Weather Update : कोकणात मुसळधार शक्य

Monsoon Rain : खानदेश, पूर्व विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले आहे. मात्र राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र आहे.

अमोल कुटे

Pune News : खानदेश, पूर्व विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले आहे. मात्र राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र आहे. आज (ता. १४) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.

गुरुवारी (ता. १३) विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश तापमानाची नोंद झाली. पूर्व विदर्भात अद्याप मॉन्सूनची प्रतीक्षा असून, मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’

मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे. बुधवारी (ता. १२) अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे. गुरुवारी (ता. १३) मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम होती. अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनचा बंगालच्या उपसागरावरील वेग मंदावलेला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात अद्यापही मॉन्सूनची प्रतीक्षा आहे.

जोरदार सरींची शक्यता :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT