Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात १० जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता; अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज

Weather Update : पुढील पाचही दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात वादळी वादळी पावसाची हजेरी सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाने आज राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला. तर पुढील पाचही दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर धाराशिव, हिंगोली, बीड, परभणी, सोलापूर, सांगली, नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी आजपासून पुढील पाचही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. तर काही ठिकाणी हलक्या सरीही पडतील, असा अंदाज आहे. उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. 

शुक्रवारीही कोकणात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारीही राज्यातील काही भागात वादळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT