Rain Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर रविवारी व सोमवारी उत्तर भागावर १००४ व दक्षिण भागावर १००६ हेक्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील त्या वेळी हलक्या पावसाची शक्यता राहील.

Team Agrowon

डॉ. रामचंद्र साबळे

Maharashtra Monsoon 2023 : महाराष्ट्रावर रविवारी व सोमवारी उत्तर भागावर १००४ व दक्षिण भागावर १००६ हेक्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील त्या वेळी हलक्या पावसाची शक्यता राहील. मंगळवारी व बुधवारी उत्तरेकडील भागावर १००२ व दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील, त्या वेळी राज्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. मात्र गुरुवारपासून महाराष्ट्रावरील उत्तरेकडील भागावर ९९८ ते १००० हेप्टापास्कल व दक्षिणेकडील भागावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील तेव्हा हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन राज्यभर चांगल्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी (ता. २०) बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमीदाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि शुक्रवारी (ता. २९) त्याचे रूपांतर चक्रीय वादळात होईल. ते चक्रीय वादळ ओडिशा किनारपट्टीकडून पश्‍चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकेल. शनिवारी (ता. २२) बंगाल उपसागराच्या उत्तरेकडील व पश्‍चिमेकडील भागात जोरदार वारे आणि अतिवृष्टी होईल.
अरबी समुद्र आणि बंगाल उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान समान म्हणजे २९ अंश सेल्सिअस राहील, त्यामुळे आयओडी तटस्थ राहील. तर हिंदीमहासागर आणि प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान समान म्हणजे ३९ अंश सेल्सिअस राहील, त्यामुळे निनो तटस्थ राहील. हवामान बदलाचे प्रभावामुळे काही भागात अतिवृष्टी, महापूर तर काही भागात दुष्काळी स्थिती दिसत आहे. सरासरीपेक्षा अकोला जिल्हयात ६० टक्के, सांगली जिल्ह्यात ७२ टक्के आणि हिंगोली जिल्ह्यात ८२ टक्के कमी पाऊस झाला आहे. तसेच २० जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

कोकण :
रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० मि मी पावसाची शक्यता असून रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ५२ ते ५७ मि.मी व रायगड जिल्ह्यात ६० मिमी पावसाची शक्यता आहे. सोमवारी रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४३ ते ४८ मि.मी., सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५२ मि.मी. आणि रायगड जिल्ह्यात ६३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के, तर दुपारची ७७ ते ८३ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र :
नाशिक जिल्ह्यात रविवारी २२ मि.मी, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ५ ते ७ मि.मी. पावसाची शक्यता असून, सोमवारी नाशिक जिल्ह्यात ३० मि.मी., नंदूरबार जिल्ह्यात १८ मि.मी., तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस आणि सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८५ टक्के, तर दुपारची ५३ ते ६६ टक्के राहील.

मराठवाडा :
रविवारी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यात २४ ते २५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तर बीड जिल्ह्यात २० मि.मी आणि परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील, आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५५ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
रविवारी वाशीम जिल्ह्यात १३ मि.मी. बुलडाणा जिल्ह्यात १८ मि.मी., तर अमरावती जिल्ह्यात २४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १३ मि.मी.; अकोला
जिल्ह्यात २२ मि.मी. आणि अमरावती जिल्ह्यात ३० मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के व दुपारची ६० टक्के राहील.

मध्य विदर्भ :
रविवारी यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३५ मिमी व वर्धा जिल्ह्यात २५ मि.मी. पावसाची शक्यता असून, सोमवारी नागपूर जिल्ह्यात ३२ मि.मी. वर्धा जिल्ह्यात २३ मिमी आणि यवतमाळ जिल्ह्यात १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील.

पूर्व विदर्भ :
रविवारी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३८ मि.मी. पावसाची शक्यता असून, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४९ ते ५२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २६ मि.मी., तर गडचिरोली जिल्ह्यात ३५ मिमी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३२ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील.

दक्षिण- पश्‍चिम महाराष्ट्र :
रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात २९ मि.मी., सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १५ मि.मी., सांगली, सातारा व नगर जिल्ह्यात ९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात १८ मि.मी. पुणे जिल्ह्यात १० मिमी, सांगली, सातारा आणि नगर जिल्ह्यांत ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आणि आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के व दुपारची ६० टक्के राहील.

कृषी सल्ला ः
१) जेथे पेरणी झाली आहे आणि नांगे पडले असल्यास तेथे बियाणे टोकावे. जेथे जास्त उगवण होऊन रोपे दाट झाली असतील तेथे विरळणी करावी
२) पाऊस चांगला झाल्यानंतर वाफशावर पेरणी करावी.
३) आंबा कलमावरील बांडगुळे काढून टाकावीत.
४) पिकांना ठिबक सिंचन, तुषार सिंचनाने पाणी द्यावे.
५) फळबागांच्यामध्ये आच्छादन करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

SCROLL FOR NEXT