Weather Update Agrowon
हवामान

South Asia Rain Prediction : दक्षिण आशियात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊसमान

Monsoon News : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाचे पूर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलूक फोरम’तर्फे (सॅस्कॉफ) वर्तविले आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात यंदाच्या मॉन्सून (Monsoon) हंगामामध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाचे पूर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलूक फोरम’तर्फे (सॅस्कॉफ) वर्तविले आहे.

दक्षिण आशियाच्या उत्तरेकडील भागासह, पूर्व आणि दक्षिण भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा, तर वायव्य, मध्य आणि ईशान्य भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

२०२२ मधील मॉन्सूनच्या पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील (२०२३) अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियायी देशांच्या फोरमची तीनदिवसीय बैठक २७ ते २९ एप्रिल कालावधीत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून घेण्यात आली.

भारतासह, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांसह जागतिक हवामान संघटनेबरोबर इतरही आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला.

जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

सप्टेंबर २०२० पासून जवळपास अडीच वर्षे असलेली ला-निना स्थिती मार्च २०२३ मध्ये निवळली. प्रशांत महासागरातील तापमान सध्या सर्वसाधारण पातळीवर आहे. जागतिक हवामान प्रारूपाच्या निरीक्षणांनुसार यंदाच्या मॉन्सून हंगामात समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढून एल-निनो स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. मात्र एल-निनोची तीव्रता आणि वेळ याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरकाचाही (इंडियन ओशन डायपोल -आयओडी) मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होतो.

सध्या दक्षिण हिंद महासागरात आयओडी स्थिती सर्वसाधारण आहे. तर मॉन्सून हंगामात ही स्थिती धनात्मक (पॉझिटिव्ह) होण्याची शक्यता आहे.

धन आयओडी स्थिती दक्षिण आशियात अधिक पावसासाठी पोषक ठरते. उत्तर गोलार्ध आणि युरेशियात डिसेंबर ते मार्च महिन्याच्या कालावधीत बर्फाचे अच्छादन सरासरीपेक्षा कमी होते.

युरेशियातील हिवाळा व उन्हाळ्यातील बर्फाचे प्रमाण व दक्षिण आशियातील मॉन्सूनचा पाऊस यांच्यात परस्परविरोधी संबंध असतो.

मॉन्सून हंगामातील (जून ते सप्टेंबर) तापमानाचा अंदाजही ‘सॅस्कॉफ’च्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे. यात हिमालयाचा पायथा वगळता दक्षिण आशियाच्या उर्वरित सर्वच भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. दक्षिण आशियाचा मध्य भाग वगळता बहुतांश कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पावसाचे वितरण असमान

‘सॅस्कॉफ’मार्फत मॉन्सून पाऊस अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रातील पावसाचे वितरण असमान राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागासह, राज्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची, तर मराठवाड्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT