Cold Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold : राज्यात अनेक भागात सरासरी तापमान जास्तच; पुढील पाच दिवस राज्याचे तापमान कसे राहणार?

Weather Update : राज्यात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीही कायम राहील, असा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात थंडीचा कडाका कायम असताना उत्तर भारतात मात्र किमान तापमानात काहीशी घट झाली. राज्यातील अनेक भागात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त दिसते. तर पुढील काही दिवस राज्यातही थंडीचा कडाका जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात थंडी कायम आहे. काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. मात्र आजही अनेक भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या काळात एरवी जाणवत असलेल्या थंडीच्या तुलनेत सध्या गारठा कमी आहे.

कमाल तापमानाची स्थिती अशीच आहे. काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर काही भागात जास्त जाणवते. राज्यात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीही कायम राहील, असा अंदाज आहे.

पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, वायव्य राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशाच्या अनेक भागात सरासरी किमान तापमान ६ अंश सेल्सिअस ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

तसेच या राज्यांमध्ये काही भागात धुक्याची चादरही सकाळच्या वातावरणात दिसून येत आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने येत आहे. यामुळे राज्यात थंडी वाढली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT