Heat Wave  Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon Update : राज्यात निम्म्या भागात मॉन्सून स्थिती 'जैसे थे'

Maharashtra Rain Update : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू राज्यात सर्वदूर पावसाने उघडीप दिली आहे. स्वच्छ सूर्य प्रकाश जमीनीवर आल्याने 'ऑक्टोबर हीट'चा चटका वाढला आहे.

Team Agrowon

Maharashtra Monsoon 2023 News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. ६) जवळपास निम्म्या महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. रविवारी (ता. ८) मॉन्सूनच्या परतीची वाटचाल जैसे थे होती. उद्यापर्यंत (ता.१०) महाराष्ट्राच्या आणखी काही भागासह पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशसह, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू राज्यात सर्वदूर पावसाने उघडीप दिली आहे. स्वच्छ सूर्य प्रकाश जमीनीवर आल्याने 'ऑक्टोबर हीट'चा चटका वाढला आहे. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ९) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर, तामिळनाडू आणि परिसरावर ४.५ किलोमीटर उंचीवर, तसेच लक्षद्वीप आणि परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. सिक्कीमपासून उत्तर ओडिशापर्यंत, तसेच छत्तीसगड पासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

निरभ्र आकाश, स्वच्छ सुर्य प्रकाश यामुळे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे होते.

अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, सोलापूर, परभणी येथे तापमान ३५ अंशांच्या पार होते. आज (ता. ८) राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.९, जळगाव ३४.४, कोल्हापूर ३३.१, महाबळेश्वर २८.४, नाशिक ३३.७, सांगली ३२.०, सातारा ३३.४, सोलापूर ३५.६, सांताक्रूझ ३२.७, डहाणू ३२.५, रत्नागिरी ३२.२, छत्रपती संभाजीनगर ३३.२, नांदेड ३४.८, परभणी ३५.३, अकोला ३६.६, अमरावती ३५.२, बुलडाणा ३२.०, ब्रह्मपूरी ३४.८, चंद्रपूर ३४.६, गडचिरोली ३४.२, गोंदिया ३४.४, नागपूर ३५.०, वर्धा ३५.५, वाशीम ३३.२, यवतमाळ ३५.५.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

अकोला ३६.६, सोलापूर ३५.६, वर्धा ३५.५, यवतमाळ ३५.५, परभणी ३५.३, अमरावती ३५.२, नागपूर ३५.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT