Cold Weather Update Agrowon
हवामान

Cold Weather Update : तापमानात वाढ; गारठा कायम

Pune Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर दोन दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर दोन दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. किमान तापमानात वाढ झाली असली, तरी राज्यात गारठा कायम आहे. आज (ता. २९) राज्याच्या किमान तापमानात वाढ आणि गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडी काहीशी कमी झाली आहे. रविवारी (ता. २८) उत्तर प्रदेशातील गोरखपूर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार राज्यात किमान तापमान ६ ते ८ अंशांदरम्यान आहे. उत्तर भारतात तुरळक ठिकाणी धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्याचे तापमान वाढले असले तरी उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे. रविवारी (ता. २८) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९ अंश तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर सरकला आहे. आज (ता. २९) किमान तापमानात वाढ होत गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१ (१३.३), धुळे ३१ (८.०), जळगाव ३१.१ (१०.८), कोल्हापूर ३०.९ (१८.१), महाबळेश्‍वर २५.१ (१४.५), मालेगाव २७.६ (१०.६), नाशिक ३०.८ (१२.५), निफाड २९.४ (९), सांगली ३१.१ (१७.४), सातारा ३१ (१५), सोलापूर ३२.६ (१८.४), सांताक्रूझ ३४.३ (१७.९), डहाणू २९.९ (१६.१), रत्नागिरी ३४.८ (२०.५),

छत्रपती संभाजीनगर २९ (१३.६), नांदेड ३०.२ (१५.८), परभणी ३०.४ (१४), अकोला ३१ (१४.५), अमरावती २८.८ (१३.६), बुलडाणा ३०.५ (१४), ब्रह्मपुरी ३०.३ (१२.८), चंद्रपूर २९.४ (११), गडचिरोली ३० (११), गोंदिया २६.५ (१०.२), नागपूर २७.९ (११.६), वर्धा २८.५ (१२.४), वाशीम ३०.६ (११.८), यवतमाळ ३१.५ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT