Monsoon Alert  Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून हंगामात देशात ९४.४ टक्के पाऊस

Monsoon Season 2023 : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात देशात ८२० मिलिमीटर (९४.४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात ९६५.७ मिलिमीटर (९७ टक्के) पाऊस पडला आहे.

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात देशात ८२० मिलिमीटर (९४.४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात ९६५.७ मिलिमीटर (९७ टक्के) पाऊस पडला आहे. यातच ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या (ईशान्य मॉन्सून) हंगामात दक्षिण भारतात सर्वसाधारण पाऊस (८८ ते ११२ टक्के) पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सून हंगामात पडलेला पाऊस, मॉन्सूनोत्तर हंगामात दक्षिण भारतात पडणाऱ्या पावसाचा अंदाज, ऑक्टोबरमधील पावसाचा अंदाज यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी शनिवारी (ता. ३०) ही माहिती दिली.

धन स्थितीत असलेली हिंद महासागरातील द्वीधृवीयता (पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल - आयओडी), तसेच पूरक मडियन ज्युलियन असोलेशन या दोन घटकांमुळे प्रशांत महासागरातील एल-निनो स्थितीचा भारतातील मॉन्सूनवर फारसा प्रभाव पडला नसल्याचे डॉ. महोपात्रा यांनी सांगितले.

मॉन्सून हंगामात वायव्य भारतात १०१ टक्के, मध्य भारतात १०० टक्के, दक्षिण भारतात ९२ टक्के, तर ईशान्य भारतात ८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मॉन्सूनच्या पावसावर शेती अवलंबून असलेल्या भागात (मॉन्सून कोअर झोन) १०१ टक्के पाऊस झाला आहे.

देशातील ३६ हवामान विभागांचा विचार करता ३ विभागांत म्हणजेच देशाच्या ९ टक्के भूभागावर सरासरीपेक्षा अधिक, २६ विभागांत (७३ टक्के भूभाग) सरासरीइतका, तर ७ विभागांत (१८ टक्के भूभाग) सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याचे डॉ. महोपात्रा यांनी सांगितले.

डॉ. महोपात्रा म्हणाले, ‘‘जूनमध्ये ९१ टक्के, जुलैमध्ये ११३ टक्के, ऑगस्टमध्ये ६४ टक्के, तर सप्टेंबर महिन्यात ११३ टक्के पाऊस झाला आहे. मॉन्सून हंगामात ९६ टक्के पावसाचा अंदाज होता. यात ४ टक्क्यांची तफावत गृहीत धरण्यात आली होती.

तर मॉन्सून हंगामात ९४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हंगामात अरबी समुद्रातील बिपॉरजॉय चक्रीवादळासह ६ कमी दाब क्षेत्र, ६ ठळक कमी दाब क्षेत्र, १ तीव्र कमी दाब क्षेत्र अशा एकूण १५ प्रणाली तयार झाल्याचे नमूद करण्यात आले.’’

ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या (ईशान्य मॉन्सून) हंगामात मुख्यत: दक्षिण भारतातील तमिळनाडू, पदुच्चेरी, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, रायलसीमा, केरळ आणि दक्षिण कर्नाटक या पाच विभागात पाऊस पडतो. यंदा या पाच विभागांत सरासरी इतका (८८ ते ११२ टक्के) पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

देशाचा विचार करता दक्षिण भारत आणि वायव्य भारताच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक, तर ईशान्य, पूर्व-मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील राज्ये आणि अति उत्तरेकडील भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशात सरासरीइतका (८५ ते ११५ टक्के) पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT