Rain  Agrowon
हवामान

Pune Rain Alert : भोसरीत ५७ मिलिमीटर पाऊस

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा रोज दणका सुरू आहे. दिवसभर ऊन तर सायंकाळनंतर जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत भोसरी येथे सर्वाधिक ५७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा रोज दणका सुरू आहे. दिवसभर ऊन तर सायंकाळनंतर जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत भोसरी येथे सर्वाधिक ५७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे रस्ते, ओढे, नाले भरून वाहू लागल्याने वाहतूकही धीम्या गतीने सुरू होती. जोरदार पावसामुळे या भागातील भाजीपाला व पिकांचे नुकसान झाले आहे.

शेतकरी अडचणीत येत असताना रब्बीच्या तोंडावर नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दिवसा उकाडा वाढत असून कमाल तापमानात काहीशी वाढ होत आहे.

तर सायंकाळी पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे. मंगळवारी सायंकाळी हवेली तालुक्यातील हडपसर येथे ४९ मिलिमीटर, तर कोथरूड ३३, कळस २७ मिलिमीटर, तर थेऊर, खेड, चिंचवड, वाघोली येथे हलका पाऊस पडला. मुळशीतील पिरंगुट येथे ३३ मिलिमीटर, तर पौड, घोटावडे, माले, मुठे, भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू येथे तुरळक सरी बरसल्या.

मावळमधील तळेगाव येथे २८ मिलिमीटर, कार्ला, खडकाळा, शिवणे, लोणावळा हलका ते मध्यम सरी, वेल्ह्यातील पानशेत, विंझर, आंबवणे, जुन्नरमधील राजूर, आपटाळे येथे तुरळक सरी कोसळल्या. खेडमधील आळंदी येथे ५१ मिलिमीटर, पाईट २८ मिलिमीटर, तर चाकण, पिंपळगाव, कडूस, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर, शिरूरमधील न्हावरा, कोरेगाव, शिरूर, बारामतीतील बारामती, पणदरे, वडगाव, उंडवडी, इंदापुरातील सणसर, दौंडमधील वरवंड, पारगाव येथे वादळी वाऱ्यासह हलक्या सरी पडल्या.

पुरंदर येथे ४९ मिलिमीटर, तर भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परींचे, वाल्हा येथे चांगलाच शिडकावा झाला. या पावसामुळे फळबागा व झेंडू, केळी अशा काही पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT