Government Decision on Farm Tax agrowon
Video

Farmer Income Tax: शेती उत्पन्नावर आयकर लागू होणार?

केंद्र सरकार शेती उत्पन्नावर आयकर आकरण्याच्या तयारी असल्याची चर्चा अधूनमधून जोर धरत असते. त्यावर समर्थनार्थ आणि विरोधात आवाज उठवले जातात. घमासान चर्चा झडतात. आणि काही काळाने मुद्दा पुन्हा बाजूला पडतो. पण खरं म्हणजे शेती उत्पन्नावर आयकर लावून सरकारनं मोकळं व्हावं, असंच मला वाटतं. आता तुम्हाला हे ऐकून धक्का बसतोय ना. यावर कोणीतरी असंही म्हणेल की, शेतकऱ्यांचं उत्पन्न छटकाभर. त्यातही तुम्ही आयकर लावा म्हणायत. आधीच उत्पन्नाचा भरोसा नाही, त्यात तुम्ही आयकर लावा म्हणताय, दुष्काळात आमचा तेरावा महिनाच. पण तरीही मी असं का म्हणतोय, शेती उत्पन्नावर आयकर का आकारायला हवा?

Team Agrowon

शेती उत्पन्नावर आयकर आकरण्याची चूळबुळ देशात पुन्हा सुरू झाली आहे. त्पन्नावरचा कर टाळण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेतीचा उत्पन्नाचा आधार घेतला जात असल्याचा संशय आल्याने आयकर विभागाने काही राज्यात तपासणी सुरू केलीय. आता आधार कसा घेतला तर शेती उत्पन्नावर आयकर आणि जीएसटी लागत नसल्याने काहीजण शेतीच्या उत्पन्नाच्या नावाखाली करातून सुटका करून घेतायत. काही प्रकरणात तर शेतीचं उत्पन्न लाखोंमध्ये दाखवलं गेल आहे. त्यामुळं आयकर विभागाने ५० लाखांपेक्षा अधिक शेती उत्पन्न दाखवणाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या ५० लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांकडे शेतजमिनीच नाही, असंही आयकर विभागाला तपासणी दरम्यान आढळलंय. २०२०-२१ पासून आयकर विभागाने काही प्रकरणात तपास सुरू केला. यामध्ये काही व्यक्तींनी एका एकरात जमिनीवर ५ लाख रुपये उत्पन्न दाखवलंय. त्यामुळे अशा व्यक्तींना आयकर विभागाने उत्पन्नाचे पुरावे द्यायला सांगितलं. त्यावर शेतीचं उत्पन्न कसं मिळवलं तर जमिनीची विक्री करून कमवल्याचं या कथित शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं. पण यावरही आता आयकर विभागाने सॅटेलाईट इमेजेस वापरुन शेतकरी किंवा जी व्यक्ति असेल त्याने खरंच शेतमाल विकला आहे की, शेत जमिनी विकली हेही तपासलं जाणार आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं या पद्धतीच्या कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांवर आयकर लावला पाहिजे, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

YCMOU Open University: मुक्त विद्यापीठाची ‘फ्यूचर ऑफ लर्निंग’कडे वाटचाल; डॉ. कलसी

MGNREGA Workers Protest: ‘मग्रारोहयो’ ठप्प, शासन गप्प!

Farm Roads: पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवा

Bael Tree Conservation: निसर्ग मित्रच्या वतीने बेल वृक्ष संवर्धन कृती उपक्रम

Sugarcane Crushing Season: साताऱ्यात ऊस गाळपाची कोटीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT