Chandrashekhar Bawankule orders agrowon
Video

Wild Animal: राज्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश

Wild Animals attack: राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मानवी जीवितहानीचे प्रमाण वाढत आहे. अशा घटनांबाबत यापुढे निष्काळजीपणा झाला, तर संबंधित अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

Team Agrowon

Chandrashekhar Bawankule orders: मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वन्य संघर्षांबाबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार परिणय फुके तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी महसूलमंत्री बावनकुळे यांनी अधिकारी वर्गाला फटकारले. बावनकुळे म्हणाले की, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वीच सूचना दिल्या होत्या. निधी कमी पडत असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून आवश्यक रक्कम उपलब्ध करून देण्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, तरीही अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आता तातडीने आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रस्ताव सादर करावा. निधीची तात्काळ व्यवस्था केली जाईल. अधिकारी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी तंत्राचा अभ्यास करून त्याचा उपयोग वन्य हल्ले रोखण्यासाठी करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT