Ladaki Bahin yojana Agrowon
Video

Ladaki Bahin yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार?

Eknath Shinde: आता या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख निश्चित करण्यात आलीय. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर १ ते १५ जुलैच्या कालावधीत अर्ज करावा लागणार आहे.

Team Agrowon

Ladaki Bahin yojana Online Application: शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिला, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा उपक्रम तत्वावर असणाऱ्या महिलां या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न २ लाख ५० हजार असेल तर अशा महिला अपात्र आहेत. त्यात एकतर पाच एकरपेक्षा अधिक शेतजमीन असेल तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. बरं एवढंच नाही तर कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स म्हणजे आयकर भरत असेल तर अशा महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणती आवश्यक आहेत? तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी, दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते पासबुक झेरॉक्स, हमीपत्र अर्ज करताना लाभार्थीकडे असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मोबाइलवरून किंवा सेतु सुविधा केंद्रावरून करता येणार आहे. तर ज्या महिलांना स्वत: अर्ज ऑनलाईन करता येणार नाही, अशा महिलांना अंगणवाडी, ग्रामपंचायत, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT