Crop Insurance agrowon
Video

Crop Insurance: शेतकऱ्यांना विमा भरपाई कधी मिळणार?

राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला पहिला हप्ता दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची विमा भरपाई रखडली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत मंजूर झालेले २ हजार १६० रुपये भरपाई रखडली आहे. राज्य सरकार कंपन्यांना ३१ मार्चच्या आधी विमा हप्ता देईल आणि शेतकऱ्यांना विमा हप्ता मिळेल, असे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानभवनात सांगितले होते.

Team Agrowon

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना कोणत्या बाबीअंतर्गत किती भरपाई द्यायची याचा आकडा काढलेला आहे. पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाईचे एकूण २ हजार ३१६ कोटी रुपये मंजुर झाले. यापैकी शासनाने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत मंजूर झालेली भरपाई देणार आहेत. ही भरपाई जवळपास २ हजार १६० कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांना यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीतून १४५५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत ७०६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून शेतकऱ्यांना १४१ कोटी भरपाई मंजूर आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई १३ कोटींच्या दरम्यान आहे. शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून या भरपाईची वाट पाहत आहेत. मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना हप्ता दिला नाही. त्यामुळे भरपाई मंजूर होऊन देखील शेतकरी वंचित आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT