Heavy rain in Vidarbha agrowon
Video

Vidarbha Rain: पुढील ३ दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

rain alert Maharashtra: नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून सतत पावसाचा जोर सुरू आहे. हवामान विभागाने आज अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Team Agrowon

Maharashtra weather update: बुलडाणा, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतही काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, मराठवाड्याचे अन्य भाग, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात पावसाचा जोर तुलनेने कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्याशा सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT