US maize market agrowon
Video

Maize Market: अमेरिकन ज्वारीची पशुखाद्यासाठी मागणी

भारतात सध्या मक्याचे दर खूपच जास्त आहेत, त्यामुळे पशुखाद्य उद्योगाला महागडा मका खरेदी करावा लागत आहे. यामुळे या क्षेत्राचे अर्थकारण कोलमडत आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील नॉन-GM ज्वारी भारताच्या मक्यापेक्षा सुमारे ४० टक्के स्वस्त आहे. त्यामुळे अमेरिकेने भारताला त्यांच्या स्वस्त नॉन-GM ज्वारीच्या आयातीस परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Team Agrowon

अमेरिका इथेनॉल आणि DDGS (डिस्टिलर ड्रायड ग्रेन्स विथ सॉल्युबल्स) यांच्या आयातीसही भारताने परवानगी द्यावी, असेही म्हणत आहे. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहेत. या चर्चांदरम्यान अमेरिकेने आपल्या कृषी उत्पादनांच्या आयातीसाठी भारताकडे आग्रह धरला आहे. भारत सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे धोरण राबवत आहे, आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे भारतातील वाढती मागणी लक्षात घेता, अमेरिका आपले इथेनॉल भारतात निर्यात करू इच्छित आहे. त्याचप्रमाणे DDGS आयात करण्यासही भारताने परवानगी द्यावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतात मक्यापासून इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे मका, पशुखाद्य आणि स्टार्च उद्योगातून मक्याला मोठी मागणी आहे, ज्यामुळे त्याचे दर वाढले आहेत. मात्र, इथेनॉल निर्मितीनंतर उरलेला DDGS हा अवशेष सोयापेंडपेक्षा स्वस्त असल्याने, सोयापेंडचा वापर आणि मागणी घटली आहे. जर अमेरिकेचा स्वस्त DDGS भारतात आयात झाला, तर पुन्हा मका आणि सोयापेंड बाजारावर दबाव येईल. त्यामुळे उद्योग क्षेत्राने सरकारकडे अशा आयातीला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ जरूर पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT