Turmeric price agrowon
Video

Turmeric price: हळदीच्या दरात चढ उतार; टोमॅटो, मका आणि सोयाबीनचे दर काय?

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण टोमॅटो, मका, हळद, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

टोमॅटोच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली. तोटा वाढल्याने बाजारातील आवक वाढत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली दिसत आहे. त्यामुळे टोमॅटोला सध्या बाजारात सरासरी ७०० ते ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारामध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येत आहे. सध्या मक्याला बाजारात सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या भाव मिळत आहे. हळदीच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. हळदीला सध्या सरासरी ११ हजार ते १६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु असले तरी सरासरी दरपातळी मात्र स्थिर दिसत आहे. सोयाबीनला आजही ४ हजार २०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे भावही ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाचे भाव देशातील बहुतांशी बाजारात सध्या ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. बाजारातील कापूस आवक सध्या ३५ हजार गाठींच्या दरम्यान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT