Turmeric market  agrowon
Video

Turmeric Market: अवघ्या दीड महिन्यात हळदीच्या दरात ३ हजारांची घसरण

देशातील बाजारात नव्या हळदीची आवक वाढत आहे. त्यामुळे दरावर दबावही वाढत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हळदीचा भाव ७ हजार ते १० हजारांच्या दरम्यान पोचला. तर महाराष्ट्र आणि तमिळनाडूत भाव १० हजार ते १३ हजारांच्या दरम्यान दिसत आहे. पुढच्या काळात हळदीची आवक आणि वाढणार आहे. त्यामुळे हळदीच्या दरावरही दबाव येऊ शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Team Agrowon

भारत हळद उत्पादनात आघाडीवर असून, जागतिक उत्पादनाच्या ८० टक्के हळद भारतात उत्पादित होते. देशात यंदा ११ लाख १६ हजार टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणाचा मोठा वाटा आहे. सध्या बाजारात हळदीची आवक वाढत असून, विशेषतः तेलंगणात भाव १० हजार रुपयांखाली गेले आहेत. आंध्र प्रदेश व तमिळनाडूतही दरात घसरण दिसून आली आहे. मागील महिन्यात १५ हजारांपर्यंत असलेले दर आता ११ ते १३ हजारांच्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रातील सांगली, वाई, वसमत आणि वाशीम बाजारांमध्येही हळदीच्या दरावर दबाव जाणवत आहे. महिनाभरातच हळदीचे दर २ ते ३ हजार रुपयांनी घटले आहेत. बाजारात आवक आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दर पुढेही दबावात राहू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT