Turmeric market rate agrowon
Video

Turmeric Price: हळदीचा बाजार स्थिरावला; कोबी, केळी आणि कापसाचे आजचे दर काय?

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हळद, हरभरा, कोबी, केळी आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

हळदीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. सध्या हळदीला सरासरी प्रतिक्विंटल १२ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी होताना दिसत आहे. आवक कमी झाली तशी हरभरा दरातही सुधारणा दिसून येत आहे. सध्या बाजारात हरभरा ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मागील दोन आठवड्यांपासून केळीचे दर स्थिर दिसत आहेत. केळी बागांची काढणी वेगाने सुरु आहे. त्यामुळे बाजारातील केळीची आवक वाढली आहे. बाजारात केळी सध्या सरासरी १ हजार ४०० ते १ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. बाजारात कोबीची आवक चांगली सुरु आहे. वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. कापसाचे भाव मागील दीड महिन्यापासून एकाच भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT